mukhymantri ladaki bahin yojana :– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाखो महिलांना या योजनेचा लाभला जातो. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये इतकी रक्कम दिले जाते परंतु या योजनेअंतर्गत अनेक महिलांनी खोटे कागदपत्र दाखल करून या योजनेचा लाभ घेतला आहे. आता लाडकी बहिण योजने संदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.mukhymantri ladaki bahin yojana
हे पण वाचा| Vivo Y300c लाँच; 12GB RAM आणि 512GB स्टोरेजनं सज्ज, किंमत फक्त 16 हजारांपासून सुरु!
लाडकी बहीण योजना बंद होणार का?
गेल्या काही दिवसांपासून विरोधकांचा दावा होता की, राज्य सरकार लाडकी बहीण योजना बंद करण्याचा विचार करत आहे. यावर अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटलं, “जोपर्यंत आम्ही महायुतीत काम करत आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही. मी लाडक्या बहिणींना हे आश्वासन देतो. महिना संपल्यावर आदिती मला संपर्क करते आणि दादा महिलांना पैसे द्या, असं सांगते. आम्ही तातडीने त्यांना पैसे देतो,” असं ते म्हणाले. यावरून स्पष्ट आहे की, लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळतच राहील, आणि त्यासाठी सरकारचे कटिबद्धता कायम राहील.
पक्ष मोठा करायचा आहे अजित पवार
अजित पवार यांनी सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं बनवायचं आहे. यासाठी अधिकाधिक जागा निवडून आणायच्या आहेत. यावर बोलताना ते म्हणाले, “आम्ही बुलढाण्याला जात आहोत, तिथे अनेक लोक आमच्या पक्षात येत आहेत. प्रतापराव चिखलीकर आणि निशिकांत पाटील यांचा प्रयत्न सुरू आहे.” त्यांनी हेही सांगितलं की, “नवीन लोकांनी पक्षात सामील होणं आम्हाला आनंद आहे, पण जुन्या लोकांना हे लक्षात ठेवा, तुम्हाला फायदाच होईल. ज्याच्यात नेतृत्व आणि धमक असेल, त्या व्यक्तीला संधी दिली जाईल.”
सर्व जाती धर्मांच्या लोकांना सभासद करा अजित पवारांचे निर्देश
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचं आवाहन केलं. ते म्हणाले, “पुणे पिंपरी चिंचवडमध्ये १० लाख सदस्यांची नोंदणी केली पाहिजे. नाशिकमध्ये ५ लाख. अशाप्रकारे, आमचं लक्ष्य एक कोटी सभासदांचं आहे.” त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सभासद करून घेण्याचं आदेश दिलं, “गरीब असो, डॉक्टर, इंजिनियर, वकील असो, त्यांना आमचं विचारधारेशी जोडा,” असं ते म्हणाले.
हे पण वाचा| Vivo Y300c लाँच; 12GB RAM आणि 512GB स्टोरेजनं सज्ज, किंमत फक्त 16 हजारांपासून सुरु!
अशाप्रकारे अजित पवार यांनी एकाच वेळी पक्षाची वाढ आणि लोकांचे हित साधण्याचे कार्य सुरू ठेवलं आहे. कार्यकर्त्यांना ते लोकांशी संपर्क साधण्याची आणि त्या लोकांना आपला विचार देण्याची सूचना देत आहेत.अशा वळणावर एक गोष्ट निश्चित आहे की, अजित पवार आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता एक नवा आयाम गाठायला सज्ज आहे. त्यांच्या या नेतृत्वातून नवा विश्वास निर्माण होईल, हे निश्चित.
5 thoughts on “आता या लाडक्या बहिणींचा लाभ होणार बंद ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर केले स्पष्ट ”