Ladki Bahin Yojana June Installment :– लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे, पण तो देखील वेळेआधी मिळालेला नाही, तर थोडा उशीराच मिळाला. त्यामुळे आता सर्व बहिणींचं लक्ष जून महिन्याच्या हप्त्याकडे लागलं आहे. जूनचा हप्ता नेमका कधी येणार, हाच सगळ्यांच्या मनातला मोठा प्रश्न आहे.
हे पण वाचा :– आता या लाडक्या बहिणींचा लाभ होणार बंद ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर केले स्पष्ट
सध्याच्या घडामोडी पाहता, गेले कित्येक महिने असे दिसून येत आहे की, संबंधित महिना संपताना किंवा कधी कधी पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला हप्त्याची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. त्यामुळे या वेळी देखील जून महिन्याचा हप्ता कदाचित जूनच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये किंवा जुलैच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप महिला व बालविकास विभागाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, अधिकृत घोषणा झाल्यावरच खात्री करा.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अर्जांची छाननी सुरू आहे. काही महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. काही अर्जदार महिला या शासकीय सेवेत आहेत, तर काहींचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे. अशा प्रकरणांमध्ये त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. शिवाय काही महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, त्यामुळे त्यांचे अर्ज देखील रद्द होणार आहेत. अर्जदार बहिणींनी निकष पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा योजनेतून नाव बाद होण्याचा धोका आहे.
हे पण वाचा :– आता या लाडक्या बहिणींचा लाभ होणार बंद ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर केले स्पष्ट
मे महिन्याचा हप्ता काहीसा उशिरा म्हणजेच जूनमध्ये मिळाल्यामुळे, बहिणींची थोडी नाराजी आहे. पण तरीही सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवत, जूनचा हप्ता लवकर मिळेल, अशी आशा सगळ्यांनी धरली आहे. सरकारच्या अधिकृत घोषणेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
लाडकी बहिणींसाठी ही योजना खरोखरच एक मोठा आधार आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक हातभार लागतोय. पण त्याच वेळी, जे पात्र नाहीत, त्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करू नये. कारण अशा प्रकरणांमध्ये सरकारकडून कडक कारवाई होण्याची शक्यता असते.
हे पण वाचा :– आता या लाडक्या बहिणींचा लाभ होणार बंद ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर केले स्पष्ट
शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं की, हक्काचं मिळालं पाहिजे पण नियमांचं पालन करायलाच हवं. सरकारकडून लवकरच हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर होईल, तोपर्यंत संयम ठेवणं गरजेचं आहे.