आज सोनं खरेदी करणार? मग उशीर नका करू, किंमती पुन्हा एका लाखाच्या दिशेने!”

Gold Price in Maharashtra :- तुम्ही सध्या सोनं खरेदी करायचा विचार करताय का? मग ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण सध्या सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा तेजी बघायला मिळते आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर चांगलाच चढत चालला आहे. खरं तर एप्रिल महिन्यात सोन्याच्या किमतींनी शंभरी पार केली होती. 22 एप्रिल रोजी शुद्ध सोनं तब्बल एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचले होते. त्या वेळी अनेकांनी घाम फोडला, कारण एवढ्या उच्चांकावर सोनं खरेदी करणं सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलं होतं.

हे पण वाचा | Motorola Edge 50 वर भन्नाट सूट; फक्त ₹१५,५०० मध्ये मिळतोय हा प्रीमियम फोन!

मात्र नंतर सोन्याच्या किमतींमध्ये घसरण झाली आणि मे महिन्यात सोनं तब्बल 93 हजारांपर्यंत खाली आलं. ग्राहकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला, पण गुंतवणूकदार मात्र थोडे चिंतेत पडले. पण आता पुन्हा एकदा सोन्याने आपला झंझावात दाखवायला सुरुवात केली आहे. सोन्याच्या किमती पुन्हा एकदा जोरात वाढत आहेत आणि आजच्या घडीला सोनं पुन्हा एका लाखाच्या जवळ पोहोचलं आहे.

तर आज, 13 जून 2025 रोजी, महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमती कशा आहेत हे पाहूया.

मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, ठाणे:

18 कॅरेट सोनं : ₹74,470 प्रति 10 ग्रॅम

22 कॅरेट सोनं : ₹91,010 प्रति 10 ग्रॅम

24 कॅरेट सोनं : ₹99,290 प्रति 10 ग्रॅम

नाशिक, लातूर, वसई-विरार, भिवंडी:

18 कॅरेट सोनं : ₹74,500 प्रति 10 ग्रॅम

22 कॅरेट सोनं : ₹91,040 प्रति 10 ग्रॅम

24 कॅरेट सोनं : ₹99,320 प्रति 10 ग्रॅम

सध्याच्या घडीला सोन्याच्या किमती पुन्हा एका लाखाच्या दिशेने झेपावत आहेत. त्यामुळे ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांनी जरा वेग करा. कारण कदाचित उद्या किंमती अजून चढू शकतात. गुंतवणुकीच्या दृष्टीने हे योग्य वेळ आहे का, हे मात्र तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराकडून नक्की तपासा.

हे पण वाचा | Realme Narzo 80 Lite 5G : कमी पैशात जास्त फीचर्स देणारा स्मार्टफोन लवकरच तुमच्या हाती!

सोनं आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. लग्न, सण, उत्सव किंवा गुंतवणूक  प्रत्येक वेळेस सोन्याचं महत्व कमी होत नाही. पण किंमतींच्या या सततच्या बदलत्या खेळात योग्य वेळ साधणं हेच खरं कौशल्य ठरतं.

Disclaimer (अस्वीकरण)

वरील बातमीत दिलेली सर्व सोन्याच्या किमती संदर्भित शहरांतील स्थानिक बाजारभावांवर आधारित आहेत आणि यात दररोज बदल होऊ शकतात. ही माहिती फक्त सामान्य माहितीसाठी देण्यात आलेली आहे. गुंतवणुकीचा किंवा खरेदी-विक्रीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या. किमतींमध्ये अचानक बदल होण्याची शक्यता असून, यासाठी लेखक किंवा प्रकाशक जबाबदार राहणार नाहीत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “आज सोनं खरेदी करणार? मग उशीर नका करू, किंमती पुन्हा एका लाखाच्या दिशेने!””

Leave a Comment

error: Content is protected !!