Free Aadhaar Card Update | आधार कार्ड हे आज प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा दस्तऐवज बनलं आहे. बँक खातं उघडायचं असेल, सरकारी योजना मिळवायच्या असतील, शाळा, रेशन, बँकिंग, सरकारी कागदपत्रं सगळीकडे आधार आवश्यक आहे. पण अनेक लोकांच्या आधार कार्डमध्ये अजूनही चुकीची माहिती आहे किंवा काही बदल करायचे आहेत. आणि हे करताना पैसे लागतात, ही गोष्ट सर्वसामान्य माणसाच्या खिशाला चांगलाच मारते. पण आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. UIDAI म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे.Free Aadhaar Card Update
हे पण वाचा| LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या सविस्तर माहिती
पूर्वी 14 जून 2025 ही शेवटची तारीख होती, पण आता आधार अपडेट करण्यासाठी थेट 14 जून 2026 पर्यंत संधी मिळणार आहे. म्हणजेच अजून एक वर्ष मोफत आधार अपडेट करता येणार आहे. ही मोठी दिलासादायक बातमी आहे, कारण लाखो आधार धारक अजूनही आपली माहिती अपडेट करू शकले नव्हते. UIDAI ने ‘Axe’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली असून त्यांनी स्पष्ट केलं आहे की, मोफत आधार अपडेट फक्त myAadhaar पोर्टलवरच करता येईल.
आता ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांनी विशेष लक्ष द्यावं, कारण जर तुम्हाला आधार कार्डमध्ये पत्ता, नाव, जन्मतारीख किंवा लिंग बदलायचं असेल, तर तुम्ही घरबसल्या मोबाईलवर किंवा संगणकावरून myAadhaar पोर्टलवर जाऊन मोफत बदल करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त ओळख आणि पत्त्याचे योग्य कागदपत्र अपलोड करावे लागतील. पण लक्षात ठेवा, बायोमेट्रिक अपडेट म्हणजे फिंगरप्रिंट, फोटो किंवा डोळ्याचं स्कॅन बदलायचं असेल, तर तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जावं लागेल आणि त्यासाठी शुल्क देखील भरावं लागेल. बायोमेट्रिक अपडेट ऑनलाइन करता येत नाहीत.
हे पण वाचा| आता या लाडक्या बहिणींचा लाभ होणार बंद ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर केले स्पष्ट
UIDAI ने आधीच सांगितलं होतं की ज्या लोकांचं आधार कार्ड 10 वर्षांहून जुने आहे, त्यांनी ते अपडेट करावं. कारण जुनी माहिती कधीकधी चुकीची असते किंवा बदललेली असते, ज्यामुळे सरकारी कामांमध्ये अडचणी येतात. त्यामुळे ही मोफत अपडेटची संधी कुणीही गमावू नये.
ज्यांना अजूनही काही शंका आहेत किंवा माहिती हवी आहे, त्यांनी UIDAI च्या टोल फ्री क्रमांक 1947 वर फोन करू शकता किंवा help@uidai.gov.in या ईमेलवर संपर्क साधू शकता. पण हे मात्र नक्की, की जर तुम्ही myAadhaar पोर्टल सोडून कुठेही – आधार केंद्र, CSC सेंटर जाऊन आधार अपडेट केलंत, तर तिथे पैसे भरावेच लागतील.
शेवटी एवढंच सांगावं लागेल की आधार कार्ड हे फक्त एक ओळखपत्र नाही, तर आजच्या घडीला सरकारच्या प्रत्येक योजनेत प्रवेश देणारी ‘चावी’ आहे. त्यामुळे आपली माहिती योग्य आणि अपडेट ठेवणं हे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी गरजेचं आहे. सरकारने दिलेली ही मोफत संधी वेळेत वापरा आणि भविष्यात कोणत्याही सरकारी कामात उशीर होऊ देऊ नका.
Disclaimer (अस्वीकरण)
वरील माहिती विश्वसनीय माध्यमांमधून आणि अधिकृत स्त्रोतांवर आधारित आहे. आधार अपडेट संदर्भातील अंतिम निर्णय, अटी व शर्ती, तसेच वेळापत्रक यासाठी कृपया UIDAI च्या अधिकृत वेबसाईट https://myaadhaar.uidai.gov.in/ वर भेट द्या किंवा अधिकृत ग्राहक सेवा क्रमांक 1947 वर संपर्क साधा. येथे दिलेली माहिती सामान्य वाचकांच्या सोयीसाठी आहे. यामधील बदल, अचूकता किंवा कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या वापरामुळे होणाऱ्या नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही. कोणतेही आर्थिक अथवा वैयक्तिक निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत माहितीची खातरजमा करावी.
1 thought on “मोफत आधार अपडेटची मोठी संधी! डेडलाइन 2026 पर्यंत वाढली, जाणून घ्या सविस्तर”