pan card apply online | पॅनकार्डधारकांसाठी सध्या एक मोठी खबरदारीची घंटा वाजली आहे. आयकर विभागाने आता पॅनकार्डसंदर्भात थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेक पॅनकार्डधारक अजूनही आपलं कार्ड इनअॅक्टिव्ह आहे हे जाणत नाहीत आणि वापर करत राहतात. पण ही चूक आता थेट खिशाला मोठा फटका देऊ शकते. कारण आयकर विभाग अशा व्यक्तींवर थेट दंडात्मक कारवाई करत आहे. pan card apply online
जर एखादा व्यक्ती इनअॅक्टिव्ह पॅनकार्ड वापरत असेल, तर त्याला 10,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. आयकर विभागाच्या या कारवाईने अनेकांच्या रात्रीची झोप उडाली आहे. पॅनकार्ड केवळ कर भरण्यासाठी नाही, तर बँकेत खाती उघडणे, गुंतवणूक करणे, प्रॉपर्टी खरेदी-विक्री, कर्ज काढणे अशा अनेक महत्त्वाच्या कामांसाठी वापरले जाते. त्यामुळे पॅनकार्ड इनऍक्टिव्ह आहे की नाही, हे जाणून घेणं फार गरजेचं आहे.
तुमचं पॅनकार्ड जर आधारकार्डशी लिंक नसेल, तर ते आपोआप इनअॅक्टिव्ह होतं. सरकारने याबाबत आधीच सूचना दिल्या आहेत, तरी अजूनही अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे आता जर तुम्ही इनअॅक्टिव्ह पॅन वापरत असाल, तर आयकर विभाग कलम 272B नुसार तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड लावू शकतो.
हे कसं ओळखायचं की तुमचं पॅनकार्ड अॅक्टिव्ह आहे का नाही? फार सोप्पं आहे. तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर आयकर विभागाच्या e-filing वेबसाइटवर जा. तिथं ‘Verify Your PAN’ हा पर्याय निवडा. मग तुमचा पॅन नंबर, नाव, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर भरून द्या. मोबाईलवर आलेला OTP टाका, आणि लगेच कळेल की तुमचं पॅनकार्ड अॅक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह.
जर इनऍक्टिव्ह असेल, तर लगेच आधार कार्ड लिंक करा. हे तुम्ही NSDL किंवा UTIISL च्या वेबसाईटवर जाऊन करू शकता. ज्या व्यक्तीकडे दोन पॅनकार्ड आहेत त्यांनी एक पॅनकार्ड त्वरित रद्द करून आयकर विभागाकडे जमा करावं. अन्यथा यावरही मोठा दंड लागू शकतो.
आज आपण बघतोय की अगदी छोट्या चुकांमुळे सामान्य माणूस अडचणीत येतो. तुम्ही मुद्दाम काही करत नसाल तरी अनावधानाने झालेली चूकही महागात पडते. म्हणून सरकारच्या नियमांची वेळेवर पूर्तता करणे हे आपल्यासाठी सुरक्षित आणि शहाणपणाचं ठरतं.