Latest Gold Price Update | सोन्याच्या बाजारात गेले काही दिवस सतत चढ-उतार सुरू आहेत. काल पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली. एप्रिल महिन्यात एका लाखाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलं हे मौल्यवान सोनं आता सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे, पण गुंतवणूकदार मात्र विचारात पडले आहेत.Latest Gold Price Update
एप्रिलमध्ये सोन्याचा भाव थेट एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत गेला होता. त्या नंतर काही दिवसांतच किंमतीत मोठी घसरण झाली आणि सोनं तब्बल 93 हजारांपर्यंत खाली आलं. त्यानंतर पुन्हा जूनमध्ये सोन्याने उंच भरारी घेतली आणि 13 जून 2025 रोजी सोन्याचा भाव एक लाख एक हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. 14 जूनला किंमतीत पुन्हा थोडी वाढ होऊन भाव एक लाख एक हजार 680 रुपये इतका गेला.
हे पण वाचा | आज सोनं खरेदी करणार? मग उशीर नका करू, किंमती पुन्हा एका लाखाच्या दिशेने!”
15 जूनला किंमत स्थिर राहिली, पण 16 जून 2025 रोजी सोन्याच्या बाजारात पुन्हा घसरणीचा ट्रेंड दिसून आला. मिळालेल्या माहितीनुसार, 16 जूनला 22 कॅरेट सोन्याचा भाव 150 रुपयांनी आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 170 रुपयांनी कमी झाला.
आज म्हणजे 17 जून 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर कसे आहेत, ते पाहूया:
आजचे सोन्याचे दर – 17 जून 2025
मुंबई:
18 कॅरेट – ₹76,130 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट – ₹93,040 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट – ₹1,01,500 प्रति 10 ग्रॅम
पुणे:
18 कॅरेट – ₹76,130 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट – ₹93,040 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट – ₹1,01,500 प्रति 10 ग्रॅम
नाशिक:
18 कॅरेट – ₹76,160 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट – ₹93,070 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट – ₹1,01,530 प्रति 10 ग्रॅम
नागपूर:
18 कॅरेट – ₹76,130 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट – ₹93,040 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट – ₹1,01,500 प्रति 10 ग्रॅम
ठाणे:
18 कॅरेट – ₹76,130 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट – ₹93,040 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट – ₹1,01,500 प्रति 10 ग्रॅम
कोल्हापूर:
18 कॅरेट – ₹76,130 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट – ₹93,040 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट – ₹1,01,500 प्रति 10 ग्रॅम
जळगाव:
18 कॅरेट – ₹76,130 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट – ₹93,040 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट – ₹1,01,500 प्रति 10 ग्रॅम
सोनं खरेदी करायचं का थोडं थांबायचं?
सध्या सोन्याच्या किंमतीत चढ-उतार सुरू आहेत. गुंतवणूकदारांसाठी हे धोक्याचं सिग्नल असू शकतं, पण सामान्य ग्राहकांसाठी ही संधी असू शकते. किंमत अजून घसरणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. आजच्या घडीला जिथे घरात लग्नाची किंवा सणासुदीची तयारी सुरू आहे, तिथे ही किंमत काहीशी परवडणारी वाटू शकते.
Disclaimer:
वरील सर्व सोन्याच्या किमती वेगवेगळ्या बाजारातील उपलब्ध माहितीनुसार दिलेल्या आहेत. सोन्याच्या किमतीत दिवसभरात किंवा वेळेनुसार बदल होऊ शकतो. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या जवळच्या स्थानिक बाजारातील दरांची खात्री करावी. या बातमीत दिलेली माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. गुंतवणूक करताना स्वतःचा योग्य निर्णय घ्यावा.
1 thought on “सोनं परत स्वस्त झालं! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, आजचं नवीन रेट पाहा!”