लाडक्या बहिणींनो तयार रहा! पुढच्या १० दिवसांत खात्यात १५०० रुपये  पण काही महिलांना मिळणार नाही हप्ता!

Ladki Bahin Yojana June Installment News  | लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सध्या एकच प्रश्न सतावत आहे  “जून महिन्याचा हप्ता कधी येणार?” मे महिन्याचा हप्ता जूनच्या सुरुवातीलाच दिला गेला होता. त्यानंतर आता पूर्ण महिना संपायला अवघे १० दिवस उरले आहेत, पण अजूनही या महिन्याच्या हप्त्याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हे पण वाचा | आता या लाडक्या बहिणींचा लाभ होणार बंद ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर केले स्पष्ट 

गावाकडच्या अनेक महिला आता रोज बँकेकडे, पोस्ट ऑफिसकडे, मोबाईलवर मेसेज बघत आहेत “कधी जमा होतात हो १५०० रुपये?”

कारण या योजनेतील रक्कम त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी खूपच उपयोगी ठरते. कोणाला किराणा घ्यायचा असतो, कोणाच्या मुलाच्या फी भरायची असते, तर कुणी वीजबिल भरायला त्या पैशांची वाट पाहतेय.

पुढच्या काही दिवसांत येण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीवरून, लाडकी बहीण योजनेचा जून हप्ता महिना संपायच्या आत म्हणजे २० ते ३० जूनच्या दरम्यान कधीही खात्यात जमा होऊ शकतो.

मात्र, सरकारकडून अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

हे पण वाचा | ‘या आठवड्यात या राशींवर पैशाचा पाऊस पडणार, पण सावधही राहा!’

एक बाब नक्की पैसे उशिरा मिळतील, पण बहुतेक महिलांना हप्ता यंदाही मिळणारच आहे.

मात्र… काही महिलांना यंदा हप्ता मिळणार नाही!

हो, ही एक दुःखद बातमी आहे. योजनेचे नियम मोडून ज्यांनी अर्ज केले होते, त्यांच्या अर्जांची आता छाननी सुरू झाली आहे.

सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की 

जिच्या घरात चारचाकी वाहन आहे

जिचं वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे

सरकारी कर्मचारी महिला

किंवा महाराष्ट्राबाहेरील महिला

अशा कोणत्याही महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

त्यामुळे अशा महिलांचे अर्ज बाद करण्यात आले असून, त्यांना यंदाचा हप्ता मिळणार नाही.

बच्चू कडू यांचा महायुतीवर घणाघात

दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या निधी आणि वितरणावरून राज्यात पुन्हा राजकीय वाद सुरू झाले आहेत.

बच्चू कडू यांनी थेट महायुतीवर तोफ डागत म्हटलं “महिलांना भावनिक फसवणूक नको, हप्ता वेळेवर मिळाला पाहिजे.”

राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना सामान्य महिलांना मात्र हप्त्याचीच चिंता आहे. कारण त्यांचं आयुष्य या १५०० रुपयांवर फारसं अवलंबून असतं.

Disclaimer:

वरील लेखात दिलेली माहिती ही विविध विश्वसनीय स्त्रोतांवर आधारित असून सामान्य जनतेच्या माहितीच्या उद्देशाने सादर करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेतील हप्त्याची तारीख, पात्रता निकष आणि अन्य अटी यामध्ये वेळोवेळी सरकारकडून बदल केला जाऊ शकतो. त्यामुळे अंतिम आणि अधिकृत माहितीसाठी संबंधित शासकीय विभागाची अधिकृत वेबसाइट किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. लेखात दिलेली माहिती ही कुठल्याही शासकीय निर्णयाची हमी किंवा घोषणाच नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “लाडक्या बहिणींनो तयार रहा! पुढच्या १० दिवसांत खात्यात १५०० रुपये  पण काही महिलांना मिळणार नाही हप्ता!”

Leave a Comment

error: Content is protected !!