फक्त एकदाच पैसे गुंतवा आणि दरमहा मिळवा 20,000 रुपये; SWP योजनेतून मिळणार करोडोंचा परतावा!

passive income scheme India | सध्या गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. FD, SIP, शेअर मार्केट हे तर प्रत्येकाच्या चर्चेचा विषय असतो. पण ज्यांना कमी जोखमीमध्ये सुरक्षित उत्पन्न हवं आहे, त्यांच्यासाठी एक जबरदस्त पर्याय उपलब्ध आहे  त्याचं नाव आहे सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (SWP).passive income scheme India

हे पण वाचा | लाडक्या बहिणींना मिळणार शून्य टक्के व्याजावर १ लाख कर्ज, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!

ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी आहे, जे एकरकमी मोठी रक्कम गुंतवून त्यावरून दरमहा उत्पन्न मिळवू इच्छितात. म्हणजेच, एकदाच पैसे गुंतवा आणि पुढची अनेक वर्षे महिन्याला नाश्ता, जेवण, औषधं, घरखर्च यासाठी आर्थिक चिंता नको!

SWP म्हणजे काय आणि ती SIP पेक्षा वेगळी कशी?

SIP मध्ये तुम्ही दरमहा थोडीथोडी रक्कम गुंतवता, ती दीर्घकाळाने मॅच्युरिटीवर मिळते. पण SWP मध्ये तुम्ही सुरुवातीलाच एकरकमी रक्कम गुंतवता आणि नंतर त्या गुंतवणुकीवरून दरमहा ठराविक रक्कम काढू शकता  अगदी पगार मिळतो तसंच! विशेष म्हणजे, ही रक्कम काढत असतानाही तुमची मूळ गुंतवणूक वाढतच राहते, कारण त्यावर बाजारानुसार परतावा मिळत राहतो.

हे पण वाचा | Motorola Edge 50 वर भन्नाट सूट; फक्त ₹१५,५०० मध्ये मिळतोय हा प्रीमियम फोन!

उदाहरण देऊन समजून घ्या – किती कमावता येईल?

समजा एखाद्या व्यक्तीने SWP योजनेत ३० लाख रुपये गुंतवले आणि सरासरी १२% परतावा मिळाला, तर तो दरमहा २०,००० रुपये नियमित उत्पन्न म्हणून काढू शकतो. २५ वर्षांत तो ६० लाख रुपये काढूनही त्याच्याकडे शिल्लक उरतील तब्बल १.७२ कोटी रुपये!

हो, हे खरं आहे. या योजनेतून तुम्ही नियमित उत्पन्न देखील मिळवू शकता आणि भविष्यासाठी मोठं भांडवलही उभं राहू शकतं.

पैसे येणार कुठून?

हा अनेकांचा प्रश्न असतो. पण जर तुम्ही निवृत्त कर्मचारी असाल, तर PF, NPS, ग्रॅच्युइटी मिळून एकरकमी चांगली रक्कम तुमच्याकडे येते. तीच SWP मध्ये गुंतवून तुम्ही जीवनात स्थैर्य मिळवू शकता.

आणि जर तुम्ही अजून तरुण आहात किंवा नुकतीच नोकरी सुरू केली आहे, तर SIP करून हळूहळू पैसे साठवले तरी १०-१२ वर्षांत चांगली रक्कम तयार होऊ शकते.

हे पण वाचा| लाडक्या बहिणींना मिळणार शून्य टक्के व्याजावर १ लाख कर्ज, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!

उदाहरण  SIP आणि SWP एकत्र केल्यास काय मिळेल?

जर तुम्ही दरमहा ₹10,000 SIP केली आणि १२ वर्षांनी ती SWP मध्ये वळवली, तर तुमचं भांडवल होईल सुमारे ₹30.8 लाख. त्याच्यावरून तुम्ही पुढील २५ वर्षं दरमहा ₹20,000 काढूनही, तुमचं एकूण भांडवल वाढून ₹1.72 कोटी होईल.

एकूण गुंतवणूक फक्त ₹14.4 लाख, आणि मिळकतीतून परतावा ₹1.72 कोटी! याला म्हणतात  चतुर गुंतवणूक.

SWP योजना कुठून सुरू करायची?

SWP ही म्युच्युअल फंड योजना आहे. त्यामुळे, ती सुरू करण्यासाठी तुम्हाला अशा म्युच्युअल फंड स्कीमची निवड करावी लागते, जी SWP ची सुविधा देते. यासाठी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता किंवा AMFI नोंदणीकृत म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म वापरू शकता.

Disclaimer:

या लेखात दिलेली माहिती सामान्य गुंतवणूक शैक्षणिक उद्देशासाठी आहे. सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (SWP), SIP किंवा इतर गुंतवणूक पर्यायांबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक स्थितीनुसार, उद्दिष्टांनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार प्रमाणित आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. शेअर बाजार, म्युच्युअल फंड यासारख्या गुंतवणुकींमध्ये बाजार जोखीम असते. या लेखातील उदाहरणे अंदाजांवर आधारित असून, वास्तविक परतावा वेगळा असू शकतो.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment