Monsoon update June 2025 :- राज्यात परत एकदा आकाश काळवंडू लागलंय. 4 जूनपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असून, काही भागात पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. कुठं गडगडाटासह मुसळधार पाऊस तर कुठं ढगफुटीचा अंदाज! काही ठिकाणी मात्र आभाळ भरून आलं तरी एकही थेंब नाही… असं विरोधाभासाचं वातावरण तयार झालंय.Monsoon update June 2025
गेल्या काही दिवसांत जोरदार पावसानं बरंच काही बदलून टाकलं. नदी-नाले दुथडी भरून वाहू लागलेत, डोंगरदऱ्या जणू झरझर वाहणाऱ्या पाण्याच्या गंगाच झाल्यात. धरणं भरायला लागलीत. पाण्याचा साठा वाढतोय, पण त्याच वेळी काही भागात अतिपावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसानही झालंय.
दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, महाराष्ट्रातील तब्बल 26 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आजच्या दिवशी वादळी वारे, विजा आणि मध्यम पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा इशारा दिला गेलाय.
कोणकोणत्या जिल्ह्यांत पाऊस पडणार?
१. कोकण विभाग:
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी
इथे हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे.
२. पश्चिम महाराष्ट्र:
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर
या भागांतील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहील.
३. मराठवाडा आणि विदर्भ:
नाशिक, धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर, वर्धा
इथे विजेसह मध्यम पाऊस आणि 30 ते 50 किमी/तास वेगाने वारे वाहतील.
४. अलर्ट नसलेले जिल्हे:
गोंदिया, भंडारा, नंदुरबार, लातूर
सध्या इथे हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.
७ ते १० जून: भाग बदलत पावसाचा खेळ
पंजाबराव डख सांगतात की, 7 ते 10 जूनदरम्यान पाऊस सगळीकडे सारखा नसेल, पण विभागनिहाय पावसाचे चांगले संकेत आहेत. शेतकऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते. जर 10 जूनपर्यंत तुमचं शेत तयार नसेल, तर काळजी करू नका 10, 11 आणि 12 जून हे तीन दिवस पुन्हा शेतीची तयारी करण्याची संधी मिळणार आहे.
१३ ते १८ जून: मुसळधार पावसाचा जोर
या काळात पावसाचा जोर कमालीचा वाढणार आहे.
पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, खान्देश, मराठवाडा या सगळ्या भागांत मुसळधार पाऊस होणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. वढे नाले वाहतील, रस्ते बंद होतील, शेती-वाहतूक यावर परिणाम होईल, असंही डखांनी सांगितलंय.
पावसामुळे झालेलं नुकसान आणि शेतकऱ्यांची चिंता
गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानं काही ठिकाणी शेतपिकांचे मोठं नुकसान झालं. कुठं पेरण्या अर्धवट राहिल्यात, कुठं उगवलेली बियं पाण्यात वाहून गेली आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगितल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. मात्र, वेळेवर योग्य निर्णय घेतल्यास नुकसान टाळता येईल.
सूचना / Disclaimer:
वरील हवामानविषयक माहिती ही हवामान विभाग (IMD) आणि हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्याकडून प्राप्त झालेल्या अंदाजांवर आधारित आहे. हवामानातील तातडीने होणारे बदल लक्षात घेता, शेतकरी व नागरिकांनी स्थानिक प्रशासन व अधिकृत स्रोतांकडून अधिकृत सूचना आणि सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही शेतीविषयक किंवा अन्य निर्णय घेऊ नयेत. या बातमीचा उद्देश फक्त माहितीपुरता आहे.
अशाच अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
2 thoughts on “राज्यात पुन्हा पावसाची हजेरी; 26 जिल्ह्यांना यलो अलर्ट, पंजाबराव डख यांचा अंदाज शेतकऱ्यांसाठी महत्वाचा!”