Best budget smartphone under 9000 | स्तात भारी स्मार्टफोन घ्यायचा विचार करताय का? हातात जास्त पैसे नाहीत, पण फोन तगडा हवा? मग ही बातमी तुमच्यासाठी सोन्यासारखी आहे. कारण सध्या सॅमसंग आणि मोटोरोला या दोन जबरदस्त ब्रँडचे काही स्मार्टफोन अवघ्या ₹9000 च्या खाली उपलब्ध आहेत आणि तेही धडधाकट फीचर्ससह!
हे पण वाचा | Motorola Edge 50 वर भन्नाट सूट; फक्त ₹१५,५०० मध्ये मिळतोय हा प्रीमियम फोन!
विशेष म्हणजे, हे फोन केवळ मजबूत बॅटरीसाठीच नाही तर चांगल्या कॅमेऱ्यांसाठी, मस्त स्क्रीनसाठी आणि आकर्षक डिझाईनसाठीसुद्धा ओळखले जात आहेत. कमी बजेटचे असले तरी हे फोन महागड्या मोबाईलला तोडीस तोड आहेत.
📱 Samsung चे बजेट धमाके
✅ Samsung Galaxy M05 –
फक्त ₹6249 मध्ये मिळणारा हा फोन म्हणजे परवडता सोने. 6.7 इंचाचा HD+ डिस्प्ले, 50MP चा झकास कॅमेरा आणि 5000mAh ची दमदार बॅटरी. शिवाय 25W फास्ट चार्जिंगची साथ!
✅ Samsung Galaxy A03 –
₹7999 मध्ये 3GB RAM आणि 32GB स्टोरेजसह येणारा हा फोन 6.5 इंचाच्या HD+ स्क्रीनसह येतो. 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीमुळे दिवसभर वापरात काही अडचण नाही.
✅ Samsung Galaxy M06 –
5G च्या युगात मागे राहायचं नसेल, तर हाच योग्य पर्याय! डिमेन्सिटी 6300 प्रोसेसर आणि ₹7999 किंमतीत 5G कनेक्टिव्हिटी हे त्याचं मोठं वैशिष्ट्य.
📱 Motorola – कमी किंमतीत जबरदस्त परफॉर्मन्स
✅ Motorola E13 –
₹6999 मध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज, 6.5 इंचाचा डिस्प्ले आणि 13MP कॅमेरा. याशिवाय 5000mAh ची मोठी बॅटरी.
✅ Motorola E7 Power –
ज्यांना अधिक बॅटरी बॅकअप आणि टिकाऊ फोन हवा आहे, त्यांच्या साठी E7 Power योग्य. ₹8999 मध्ये 5200mAh बॅटरी, Helio G25 प्रोसेसर आणि 13MP कॅमेरा मिळतो.
✅ Moto G05 –
फक्त ₹7098 मध्ये 5200mAh बॅटरी आणि डॉल्बी साऊंडसह, हा फोन ऑडिओ लव्हर्ससाठी खास.
शेवटी काय घ्यावं?
जर तुम्ही असा फोन शोधत असाल जो दिवसभर चालेल, फोटोही भारी घेईल आणि दिसायलाही स्मार्ट वाटेल तेही कमी पैशांत तर हे फोन तुमच्यासाठीच आहेत.
शेतीमालाची किंमत कमी मिळाली, खर्च वाढलाय, पण तरीही घरातल्या मुलांना किंवा स्वतःसाठी एक भरवशाचा फोन घ्यायचाच आहे… अशा वेळी ₹9000 च्या आत हे पर्याय खरोखर उपयोगी पडतात.
Disclaimer
या लेखात दिलेली सर्व किंमती, फीचर्स आणि ऑफर्स लेखनाच्या वेळेस बाजारात उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे दिल्या आहेत. यात कोणत्याही ब्रँडची जाहिरात करण्याचा हेतू नाही. वेळोवेळी उत्पादनांच्या किंमती आणि ऑफर्समध्ये बदल होऊ शकतो. कृपया खरेदी करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाइट किंवा दुकानामध्ये खात्री करून घ्या. या लेखातील माहितीचा उपयोग वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावा.