Business Loan For Women | राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेनं खरंच एक नवा इतिहास घडवला आहे. ग्रामीण भागातल्या बायका असोत की शहरातल्या… या योजनेमुळे लाखो महिलांना शासनाशी थेट जोडता आलं. कितीतरी महिलांनी या योजनेच्या मदतीनं आपल्या आयुष्याला नवा वळण दिला. आता तर मुंबईतल्या महिलांसाठी आणखी एक मोठी संधी चालून आली आहे ती म्हणजे शून्य टक्के व्याजदराने 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळण्याची!Business Loan For Women
हे पण वाचा | लाडक्या बहिणींनो तयार रहा! पुढच्या १० दिवसांत खात्यात १५०० रुपये पण काही महिलांना मिळणार नाही हप्ता!
होय, बरोबर ऐकलंत. आता ‘लाडकी बहीण योजना’त सहभागी असलेल्या महिलांना मुंबई बँक शून्य टक्के दराने कर्ज पुरवणार आहे. मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी ही महत्वाची माहिती दिली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही कल्पना होती की महिलांचे पैसे उद्योग-व्यवसायांमध्ये गुंतले गेले पाहिजे. आणि म्हणूनच, ज्यांना आधी ९ टक्के दराने कर्ज मिळायचं, त्याचं आता शून्य टक्के व्याजदरात रुपांतर होणार आहे.
या निर्णयामागे राज्य सरकारच्या चार प्रमुख महामंडळांचा सहभाग आहे.
🔹 अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ
🔹 भटक्या विमुक्तांसाठीचं महामंडळ
🔹 ओबीसी महामंडळ
🔹 आणि पर्यटन महामंडळाची ‘आई योजना’
या सगळ्या योजनांमधून महिलांना १२ टक्क्यांपर्यंत व्याजाची परतफेड केली जाते. म्हणजेच, मुंबई बँक जेव्हा महिलांना कर्ज देईल, तेव्हा या महामंडळांकडून त्यांना व्याजाची परतफेड केली जाईल. आणि त्यामुळे शेवटी, कर्ज घेणाऱ्या महिलेला काहीही व्याज द्यावं लागणार नाही एकदम शून्य टक्के!
महिलांना किती आणि कशासाठी कर्ज?
या योजनेअंतर्गत एका महिलेला 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. विशेष म्हणजे, ५ ते १० महिला एकत्र येऊन जर कुठला छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्या मिळून हे कर्ज घेऊ शकतात. हे कर्ज मिळण्यासाठी संबंधित महिलेला मुंबई बँकेत अर्ज करावा लागेल. त्यानंतर बँक व्यवसायाची तपासणी करेल आणि मग कर्ज दिलं जाईल.
हे पण वाचा | आता या लाडक्या बहिणींचा लाभ होणार बंद ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर केले स्पष्ट
मुंबई बँकेचे अध्यक्ष दरेकर म्हणाले की, “आमच्याकडे सध्या जवळपास १ लाख महिला सभासद आहेत. त्यापैकी १२ ते १३ लाख महिलांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतला आहे. या सर्वांना या नव्या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे.”
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय झाला. यामध्ये राज्य शासनाचे सचिव, अतिरिक्त सचिव आणि चारही महामंडळांचे संचालक होते. याच बैठकीत महिला सक्षमीकरणासाठी या ‘शून्य टक्के कर्ज’ योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
शून्य व्याज म्हणजे
सामान्यपणे बँक कर्ज दिल्यावर ग्राहकांकडून काही टक्के व्याज घेतं. पण या योजनेत, महिला कर्ज घेतल्यानंतर ते व्याज शासनाच्या संबंधित महामंडळाकडून परत दिलं जातं. त्यामुळे महिलांना प्रत्यक्षात शून्य टक्के व्याजाचं कर्ज मिळतं.
या योजनेचा उपयोग कोण करू शकतं?
जर तुम्ही ‘लाडकी बहीण योजना’त लाभार्थी असाल आणि मुंबईत राहत असाल, तर तुम्ही सहजपणे मुंबई बँकेत अर्ज करून हे कर्ज मिळवू शकता. बँक तुमच्या व्यवसायाची माहिती घेईल, आणि सर्व काही योग्य वाटल्यास, कर्ज मंजूर होईल.
महत्वाचं म्हणजे:
हे कर्ज फक्त वैयक्तिक वापरासाठी न करता, व्यवसायासाठी असावं लागतं. म्हणजे जर तुम्ही पापड, मसाला, डबे, शिवणकाम, किंवा अन्य कोणताही लघुउद्योग सुरू करायचं ठरवलं असेल, तर हे कर्ज तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल.
2 thoughts on “लाडक्या बहिणींना मिळणार शून्य टक्के व्याजावर १ लाख कर्ज, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!”