बांधकाम कामगार या योजनेची ऑनलाईन नोंदणी कशी करायची? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती!

construction workers : बांधकाम आणि इतर असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. आता बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. यामध्ये नोंदणी केलेल्या कामगारांना शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य अशा विविध योजना मिळू शकणार आहेत.construction workers

भारत सरकारने 1996 मध्ये लागू केलेल्या ‘इमारत व इतर बांधकाम कामगार कायदा’ अंतर्गत महाराष्ट्र सरकारने 2007 मध्ये बांधकाम कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन केले. सुरुवातीला पाच शासकीय प्रतिनिधींच्या माध्यमातून मंडळ कार्यरत झाले.

ऑनलाईन नोंदणीसाठी पात्रता काय?

18 ते 60 वयोगटातील बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेले कामगार नोंदणीस पात्र आहेत. यासाठी मागील 12 महिन्यांमध्ये किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असणे आवश्यक आहे.

लागणारी कागदपत्रे:

  • वयाचा पुरावा
  • 90 दिवसांच्या कामाचे प्रमाणपत्र
  • रहिवासी पुरावा
  • ओळखपत्र
  • 3 पासपोर्ट आकाराचे फोटो
  • नोंदणी फी ₹25 आणि ₹60 वार्षिक वर्गणी (5 वर्षांसाठी)

नोंदणीसाठी फॉर्म-V भरून वरील कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्ज यशस्वीरित्या स्वीकारल्यानंतर कामगारास एक युनिक नोंदणी क्रमांक प्रदान केला जातो.

कल्याणकारी योजनांचा थेट लाभ

राज्य शासनाकडून या नोंदणीच्या माध्यमातून कामगारांना चार प्रमुख प्रकारच्या योजना लागू करण्यात आल्या आहेत:

  • सामाजिक सुरक्षा
  • शैक्षणिक सहाय्य
  • आरोग्यविषयक योजना
  • आर्थिक मदत योजना

यातील बहुतांश लाभ थेट संबंधित कामगारांच्या बँक खात्यात जमा केला जातो. यामुळे पारदर्शकता आणि सुलभता वाढली असल्याचं शासनाचे म्हणणं आहे.

‘उद्योगिनी’ योजनेतून महिलांना विशेष प्रोत्साहन

या योजनांव्यतिरिक्त महिलांसाठी ‘उद्योगिनी योजना’ ही सुरू करण्यात आली असून, महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज व प्रशिक्षण यांसारखी मदत दिली जाते.

अधिक माहितीसाठी संपर्क

ज्यांना या योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर संबंधित वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

अस्वीकृती (Disclaimer):

वरील माहिती ही विविध अधिकृत शासकीय संकेतस्थळे व विश्वासार्ह स्त्रोतांच्या आधारे संकलित केलेली आहे. वाचकांनी अर्ज करण्याआधी संबंधित अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून खात्री करावी. या लेखात दिलेली माहिती बदलण्याची शक्यता असून, त्याची जबाबदारी लेखक किंवा संकेतस्थळ घेणार नाही.

Leave a Comment