१५०० वरून थेट ३०००! लाडली बहना योजनेत पैशांचा पाऊस, खातं तपासा आता! 

Indian state women schemes | मध्य प्रदेश सरकारने महिलांसाठी ज्या लाडली बहना योजनेची (Ladli Behna Yojana) सुरुवात केली, ती आता केवळ नोंदणीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर प्रत्यक्ष लाभ देण्यातही सरकारने मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात जशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली जाते, तशीच मध्य प्रदेश सरकारनं महिलांसाठी ही योजना सुरू केली आणि आता या योजनेत दर महिन्याचा हप्ता वाढवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. Indian state women schemes

हे पण वाचा | लाडकी बहिण योजनेचा बारावा हप्ता कधी मिळणार? या दिवशी येणार पैसे!

सुरुवातीला महिलांच्या खात्यात १००० रुपये जमा केले जात होते. त्यानंतर ही रक्कम १२५० रुपये झाली. पण आता रक्षाबंधननिमित्त महिलांना खास गिफ्ट देत १५०० रुपयांचा थेट हप्ता त्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. म्हणजेच, महिलांच्या आर्थिक मदतीसाठी सरकार पावलं उचलू लागलंय.

यापुढे ही रक्कम दरवर्षी वाढवण्याचं सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जाहीर केलं की २०२८ पर्यंत हाच हप्ता वाढवत ३००० रुपये प्रतिमहिना केला जाईल. दिवाळीसुद्धा महिलांसाठी खास ठरणार असून त्या वेळी देखील विशेष रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली जाणार आहे.

हे सगळं ऐकून आनंद वाटतोय, पण राजकारण त्यातसुद्धा आहेच. काँग्रेसने भाजपवर टीका करत म्हटलंय की त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेलं वचन वेळेत पूर्ण केलं नाही. पण भाजप सरकार म्हणतं, “आम्ही पाच वर्षांचा संकल्प केला होता आणि तो पूर्ण करतोय. प्रत्येक वर्षी रक्कम वाढवली जाईल, ही आमची बांधिलकी आहे.”

सध्या महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून, ज्यांनी अद्यापही काही कारणांमुळे आपले खाते आधारशी लिंक केलेलं नाही, त्यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्त्यात अडचण येऊ शकते.

हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेचा जून  महिन्याचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या ताजे अपडेट्स

योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक मदतीसह सन्मान मिळावा, त्यांना स्वावलंबी व्हायला मदत व्हावी, हाच सरकारचा मुख्य हेतू आहे. खेड्यापाड्यांमधून योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची उदाहरणं आज सोशल मीडियावर चर्चेत आहेत. काहींच्या संसारात या पैशांनी खरंच मोठा बदल घडवून आणला आहे. कोणाला मुलीच्या शिक्षणासाठी मदत झाली, कोणाला घरखर्चासाठी आधार मिळाला.

राजकारण एक बाजू असली, तरी या योजनांनी अनेक महिलांच्या चेहऱ्यावर हास्य आलंय, त्यांच्यात आत्मविश्वास जागा झालाय, हे नक्की. सरकारी योजना जर वेळेवर आणि पारदर्शकपणे राबवल्या गेल्या, तर त्या समाजाला उभारी देऊ शकतात. ‘लाडली’ की ‘लाडकी’ नावं वेगळी असली तरी उद्देश एकच  महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय.

Disclaimer:

वरील माहिती विविध अधिकृत स्रोतांवर आधारित असून ती केवळ जनहितासाठी आणि सामान्य माहितीच्या उद्देशाने देण्यात आलेली आहे. योजनेशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा स्थानिक प्रशासनाकडून खात्री करून घेणे आवश्यक आहे. लेखात दिलेली रक्कम, अटी व शर्ती वेळोवेळी बदलू शकतात. आम्ही कोणत्याही आर्थिक नुकसानीस जबाबदार राहणार नाही.

Leave a Comment