फक्त १०वी पास महिलांसाठी सुवर्णसंधी! LIC देणार प्रशिक्षण, पगार आणि एजंट कोड  जाणून घ्या संपूर्ण योजना!”

LIC Vima Sakhi Yojana | महिलांना सक्षम करण्यासाठी सरकार अनेक पावलं उचलतंय. कुठं बिनव्याजी कर्ज, कुठं व्यवसायासाठी मदत तर कुठं थेट पगारासह नोकरीची संधी. ही बातमी आहे अशाच एका नव्या योजनेची, जी विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी सुवर्णसंधी घेऊन आली आहे. विमा क्षेत्रात महिलांना पुढं आणण्यासाठी LIC आणि केंद्र सरकारने मिळून सुरु केलेली ही योजना म्हणजेच  “एलआयसी विमा सखी योजना.”LIC Vima Sakhi Yojana

हे पण वाचा | लाडक्या बहिणींना मिळणार शून्य टक्के व्याजावर १ लाख कर्ज, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!

ही योजना आहे तरी काय?

विमा सखी योजनेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे  महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. विशेषतः ज्या महिला ग्रामीण किंवा अर्धशहरी भागात राहतात, त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरू शकते. LIC या देशातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीने या माध्यमातून महिलांना आपल्याच कंपनीत एजंट म्हणून संधी द्यायची ठरवली आहे.

मिळतोय मोफत प्रशिक्षण आणि पगार!

या योजनेअंतर्गत महिलांना LIC एजंट बनण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिलं जातं. आणि विशेष म्हणजे, हे प्रशिक्षण फुकटचं नाहीये, प्रशिक्षण घेतानाच महिलांना ५००० ते ७००० रुपयांचा स्टायपेंड दिला जातो. म्हणजे घर बसल्या कमाईची सुरुवात.

प्रशिक्षणात काय शिकवलं जातं?

या प्रशिक्षणामध्ये महिलांना विमा काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, विमा विक्री कशी करायची, ग्राहकांशी संवाद कसा साधायचा, यासारख्या गोष्टी शिकवल्या जातात. वित्तीय साक्षरतेपासून ते पॉलिसी डिलिंगपर्यंत सगळं काही शिकवलं जातं.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलेला “एलआयसी एजंट कोड” आणि “विमा सखी” सर्टिफिकेट दिलं जातं. यानंतर ती LIC च्या अधिकृत एजंट म्हणून काम करू शकते. यातून ती पॉलिसी विक्री करून कमिशन कमवू शकते. पहिल्याच वर्षात ४८,००० रुपयांपर्यंतची कमाई शक्य आहे. त्याव्यतिरिक्त बोनस आणि इन्सेटिव्हही मिळतात.

सरकारचं मोठं उद्दिष्ट!

या योजनेअंतर्गत सरकारचं उद्दिष्ट आहे – १ लाख महिलांना विमा सखी बनवण्याचं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांना प्रशिक्षण देऊन, त्यांना कमाईची संधी देणं, हा सामाजिक बदल घडवण्याचाच प्रयत्न आहे.

कोण अर्ज करू शकतं?

फक्त महिलांसाठीच ही योजना आहे.

अर्जदाराचं वय १८ ते ७० वर्षांदरम्यान असावं.

किमान १०वी पास असणं आवश्यक आहे.

अर्ज कुठे करायचा?

महिलांनी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

तसेच CSC पोर्टल (कॉमन सर्व्हिस सेंटर) वर जाऊनही अर्ज करता येतो.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment