रेल्वेत ६१८० जागांसाठी भरती; २८ हजार पगार, अर्जाची शेवटची तारीख २८ जुलै!

Railway Technician Recruitment | भारतीय रेल्वेत नोकरीची वाट पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. केंद्र सरकारच्या रेल्वे भरती बोर्डाने (RRB) तब्बल ६१८० टेक्निशियन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ग्रामीण भागातल्या मुलांनी स्वप्नातही पाहिलेली सरकारी नोकरी आता हाकेच्या अंतरावर आहे.

ऑनलाइन प्रकारे अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

कधीपासून सुरू होणार अर्ज?

ही भरती प्रक्रिया २८ जून २०२५ पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे. लक्षात ठेवा, अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. उशीर केल्यास सुवर्णसंधी हुकण्याची शक्यता!

रिक्त पदांचा तपशील :

रेल्वेच्या १८ झोनमध्ये ही भरती होणार असून, त्यामध्ये खालीलप्रमाणे पदे उपलब्ध आहेत –

टेक्निशियन ग्रेड १ (सिग्नल) : १८० पदे

टेक्निशियन ग्रेड ३ (ओपन लाइन) : ६००० पदे

एकूण पदसंख्या : ६१८०

पात्रता काय पाहिजे?

टेक्निशियन ग्रेड १ साठी उमेदवाराकडे सायन्स, फिजिक्स, कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स, IT किंवा इन्स्ट्रुमेंटेशन या शाखेत बॅचलर डिग्री असावी. बीएससी (फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स) केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

टेक्निशियन ग्रेड ३ साठी १०वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI डिप्लोमा असणे आवश्यक आहे. वयाची अट –

ग्रेड ३ : १८ ते ३३ वर्षे

ग्रेड १ : कमाल वयोमर्यादा ३६ वर्षे

निवड कशी होणार?

उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे अभ्यासाला सुरुवात लवकर करणे अत्यंत गरजेचे आहे.

पगार किती मिळणार?

सरकारी नोकरी म्हटली की सर्वात पहिला प्रश्न पगाराचा!

टेक्निशियन ग्रेड १ (सिग्नल) : ₹२९,२००/महिना

टेक्निशियन ग्रेड ३ : ₹१९,९००/महिना

साथ मिळेल ती सरकारी सुविधा, भविष्याची हमी आणि समाजात मान!

हे पण वाचा | Motorola Edge 50 वर भन्नाट सूट; फक्त ₹१५,५०० मध्ये मिळतोय हा प्रीमियम फोन!

अर्ज शुल्क किती आहे?

सामान्य प्रवर्ग – ₹५००

राखीव प्रवर्ग (SC/ST/OBC/महिला) सवलत उपलब्ध

शहरातले नव्हे, तर गावातल्या लेकरांनाही ही संधी मिळावी, यासाठी सरकारनं भरतीची प्रक्रिया पारदर्शक केली आहे. मोबाईलवरून घरी बसून अर्ज करता येणार आहे. आता मागे नको वळून पाहायला  हीच वेळ आहे स्वतःचं भविष्य उज्वल बनवण्याची!

Disclaimer: वरील माहिती अधिकृत RRB जाहिरतीच्या आधारे दिली असून, अर्ज करण्याआधी अधिकृत संकेतस्थळावर एकदा खात्री करून घ्यावी.

Leave a Comment