१२ जूनपासून मान्सूनचं जोरदार आगमन! महाराष्ट्रात पुन्हा दमदार पावसाची शक्यता

Rain Alert in Maharashtra :- गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या महाराष्ट्राला आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हवामान विभाग आणि अनुभवी हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार, १२ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आणि सामान्य जनतेत पुन्हा एकदा आशेची पालवी उमलू लागली आहे.Rain Alert in Maharashtra

हे पण वाचा| देशभरात मान्सूनचा जोर वाढतोय IMD चा मुसळधार पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हवामानात मोठा बदल

१२ ते १६ जून या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये विशेषतः १४ ते १६ जून या काळात मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत दमदार पाऊस होण्याची शक्यता जाणवते.

सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली  या १३ जिल्ह्यांमध्ये विशेषतः जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय इतर विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता जाणवत असल्याचेही हवामान तज्ज्ञ सांगत आहेत.

हे पण वाचा| LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या सविस्तर माहिती 

सध्या अनेक शेतकरी धूळ पेरणीचा विचार करत आहेत. मात्र, हवामानाचा अंदाज पाहता, १५ जूननंतरच चांगल्या पावसाची ओल आणि वाफसा मिळणार असल्यामुळे, सर्वसामान्य शेतकऱ्यांनी थोडा संयम ठेवून, स्वतःच्या विवेकबुद्धीने आणि शेतातील ओल पाहूनच पेरणी करावी, असा सल्ला देण्यात येतो आहे.

ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आणि बक्कळ ओल आहे, त्यांनी मात्र पुढील दोन-तीन दिवसांतच पेरणीचा निर्णय घेण्याचा विचार करू शकतात. दुसरीकडे, जे शेतकरी मे महिन्यात बे-मोसमी पावसावर पेरण्या करून बसले आहेत, त्यांनीही अजिबात घाबरायचं कारण नाही. कारण येणारा पाऊस त्यांच्या पिकांना नक्कीच फायदेशीर ठरेल, असं जाणवतं.

हे पण वाचा| Vivo Y300c लाँच; 12GB RAM आणि 512GB स्टोरेजनं सज्ज, किंमत फक्त 16 हजारांपासून सुरु!

गेल्या आठवड्यापासून मुंबई-पुण्यात पोहोचलेला मान्सून ठप्प झाल्यासारखा आहे. पुढे जाण्याच्या हालचाली दिसत नव्हत्या. विशेषतः खान्देश, नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ  इथे अजून मान्सून पोहोचलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अस्वस्थता वाढली होती.

परंतु, आता १२ जूनपासून हवामानात मोठा बदल होणार आहे. मान्सूनला बळकटी देणारी प्रणाली तयार होण्याची शक्यता वाढत आहे. त्यामुळे मृग नक्षत्रात चांगल्या पावसाच्या शक्यता आता नक्कीच निर्माण झाल्या आहेत.

आज पाणी साठवणं आणि योग्य वेळी शेती करणं हेच भविष्य घडवणारं काम आहे. मान्सून काहीसा उशीराने येत असला, तरी तो भरघोस पाऊस घेऊनच येणार, याबाबत शंका नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता, जमिनीची तयारी करून, हवामानाच्या स्थितीवर लक्ष ठेवून, आपला पुढील निर्णय घ्यावा. शेती म्हणजे निसर्गाशी जुळवून घेतलेली सजीव कला आहे आणि ती कला, संयम, परिश्रम आणि विश्वासानेच फुलते.

टीप:

या लेखात दिलेली हवामानविषयक माहिती विविध सरकारी व खासगी हवामान एजन्सीजच्या अंदाजावर आधारित आहे. यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे शेतीसंबंधी कोणताही निर्णय घेताना स्थानिक कृषी विभाग, हवामान विभाग किंवा तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या लेखाचा उद्देश केवळ सामान्य माहिती देण्यापुरता आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment