IMD Weather Alert Maharashtra | राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली असून हवामान खात्याने आता अधिक सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज बुधवारी महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट तर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हे पण वाचा| PM किसानचा 20 वा हप्ता लवकरच जून 2025 मध्ये मिळणार पैसे, स्थिती व ई-केवायसी लगेच तपासा!
हवामान विभागाने सांगितले की, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह वादळं आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा धोका आहे.
मुंबईसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट मुंबई, ठाणे, कोल्हापूर घाटमाथा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि संपूर्ण विदर्भ क्षेत्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून वीज चमकण्याच्या घटना होऊ शकतात.
कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता कोकणात आज आणि उद्या मोठा पाऊस कोसळणार आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी करत स्थानिक प्रशासन व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काही भागांमध्ये जलसाचं होण्याची शक्यता आहे आणि समुद्रात भरती येऊ शकते, त्यामुळे मासेमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उद्या 19 जूनचं हवामान कसं असेल? गुरुवारी म्हणजेच 19 जून रोजी देखील राज्यात चार जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट दिला गेला आहे. यात रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा या भागांचा समावेश आहे. त्याच वेळी मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, जळगाव, संभाजीनगर, जालना आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.
हे पण वाचा| देशभरात मान्सूनचा जोर वाढतोय IMD चा मुसळधार पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हवामानात मोठा बदल
शेतकरी आणि सामान्य माणसासाठी सूचना पावसामुळे शेतीचे कामं करताना खबरदारी घेणं गरजेचं आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर काम टाळा. वाहनचालकांनीही घाटमाथ्यावर गाडी चालवताना काळजी घ्यावी. जर तुमच्या परिसरात सतत पावसाचा जोर वाढत असेल, तर स्थानिक प्रशासनाच्या सूचना वेळेवर ऐकाव्यात.
Disclaimer:
या लेखात दिलेली माहिती विविध माध्यमांतून (हवामान खात्याचे संकेतस्थळ, बातम्या व अन्य सार्वजनिक स्त्रोत) मिळालेल्या माहितीनुसार तयार करण्यात आली आहे. वाचकांनी निर्णय घेताना अधिकृत संकेतस्थळावरील किंवा स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचा आधार घ्यावा. या लेखातील माहितीवर आधारित कोणतीही कृती करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लेखक अथवा प्रकाशक यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही नुकसानास जबाबदार राहणार नाहीत.