मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता ! हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी दिल्या महत्त्वाच्या सूचना 

IMD weather update Marathwada :- गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसानं चांगलीच उघडीप दिली होती. उन्हाचा कडाका वाढला होता, जमिनी तापल्या होत्या, आकाश ढगांविना कोरडं झालं होतं. पण आता पुन्हा एकदा आभाळ भरून आलं आहे. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत मराठवाड्यावर पुन्हा एकदा पावसाचं सावट घोंगावत आहे.

हे पण वाचा :– देशभरात मान्सूनचा जोर वाढतोय IMD चा मुसळधार पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हवामानात मोठा बदल

११ जूनपासून मुसळधार पावसाची चाहूल लागली आहे. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह (ताशी ४० ते ५० कि.मी.) मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १२ जून रोजी धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्हे तर १३ जून रोजी धाराशिव, लातूर, नांदेड आणि बीड जिल्हे मुसळधार पावसाच्या शक्यतेत आहेत.

१४ जून रोजीही बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या दरम्यान ४० ते ६० कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हे वारे शेती पिकांसाठी आणि झाडांना घातक ठरू शकतात.

हे पण वाचा :– पावसाळ्यापूर्वीच शासनाचा मोठा निर्णय! जून महिन्यात मिळणार तीन महिन्यांचं रेशन ?

तसेच, ११ ते १४ जूनदरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये जसे की धाराशिव, लातूर, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

पेरणीसाठी अजून थांबावं लागणार

मराठवाड्यात १० ते १२ जूनदरम्यान काही ठिकाणी आणि १३ व १४ जून रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्याफुलक्या पावसाच्या सरी कोसळतील. मात्र, हे पाऊस पेरणीयोग्य (७५ ते १०० मिमी) मानला जात नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी अजून पेरणीची घाई करू नये, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

हे पण वाचा :– राज्यात पुन्हा पावसाची हजेरी; 26 जिल्ह्यांना यलो अलर्ट, पंजाबराव डख यांचा अंदाज शेतकऱ्यांसाठी महत्वाचा!

पाऊस झाला म्हणजे लगेच बी लावण्याचा विचार अनेक शेतकऱ्यांच्या मनात येतो, पण जर पावसाचं प्रमाण कमी राहिलं, तर बी उगवत नाही आणि नुकसान केवळ बीजाचं होत नाही, तर जमिनीचं आरोग्यही ढासळतं. त्यामुळे थोडी थांबावं, जमिनीत वापसा म्हणजेच ओल असताना पूर्व मशागतीची कामं पूर्ण करून घ्यावीत. पावसाची योग्य ती मात्रा मिळेपर्यंत संयम बाळगावा.

तापमानात घट, बाष्पोत्सर्जन कमी

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत मराठवाड्यात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होणार आहे. मात्र, किमान तापमान फारसं बदलणार नाही. त्यामुळे वातावरण काहीसं थंडसर राहील, पण दमटपणाही जाणवेल.

हे पण वाचा :– LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या सविस्तर माहिती 

सॅक, इस्त्रो अहमदाबाद यांच्या बाष्पोत्सर्जनाच्या उपग्रहचित्रांनुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झाला आहे. याचा अर्थ हवा आणि जमिनीतून होणाऱ्या बाष्पाचे प्रमाण घटले आहे, जे शेतीसाठी फायदेशीर मानले जातं.

१३ ते १९ जून  महत्वाची वेळ

विस्तारीत हवामान अंदाज (ERFS) सांगतो की १३ ते १९ जूनदरम्यान मराठवाड्यात पाऊस सरासरीपेक्षा जास्त होणार आहे. त्याचबरोबर कमाल आणि किमान तापमान हेही सरासरी इतकंच राहील. म्हणजेच ही वेळ खरी पेरणीसाठी योग्य असू शकते. मात्र त्यासाठी हवामान खात्याकडून येणाऱ्या अद्ययावत माहितीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

शेवटी एकच गोष्ट  “थोडं थांबा, पुढं सुख आहे”

शेतकरी हा नेहमी निसर्गावर अवलंबून असतो. त्याला आभाळाकडे बघून निर्णय घ्यावा लागतो. पण आज हवामान तंत्रज्ञानाच्या आधारे आपण अधिक माहितीपूर्वक निर्णय घेऊ शकतो. थोडा संयम ठेवला, तर पेरणीची योग्य वेळ नक्कीच मिळेल.

डिस्क्लेमर:

वरील हवामानविषयक माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई आणि संबंधित अधिकृत स्त्रोतांच्या अंदाजावर आधारित आहे. हवामानामध्ये अचानक बदल होऊ शकतो, त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतीसंबंधी निर्णय घेताना स्थानिक कृषी अधिकारी, कृषि विद्यापीठ किंवा हवामान तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. लेखात दिलेली माहिती केवळ मार्गदर्शनासाठी आहे. लेखक वा प्रकाशक कोणत्याही प्रकारच्या नुकसानास जबाबदार राहणार नाही.

अशाच अनेक नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment