Maharashtra Farmer Loan Waiver: बच्चू कडूंचं उपोषण सुरु, अजित पवार म्हणाले ‘कर्जमाफी मिळणार, पण…!’

Maharashtra Farmer Loan Waiver :– सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोठं आंदोलन पेटलं आहे. बच्चू कडू यांनी मागील पाच दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलं आहे. त्यांना शेतकरी, आमदार, खासदार, विविध संस्था आणि अगदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचाही सक्रिय पाठिंबा मिळतो आहे. शेट्टी यांनी तर आपल्या कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं  “मंत्री कुठे दिसले तर तुडवा!”Maharashtra Farmer Loan Waiver

हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकार देणार दरमहा पेन्शन जाणून घ्या पात्रता, कागदपत्रं आणि अर्ज प्रक्रिया

पण यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकशाहीचा मुद्दा ठामपणे मांडला. “ही हुकूमशाही नाही, लोकशाही आहे. कोणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी नाही. सरकारने कधीही शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारली नाही, योग्य वेळी नक्की मदत केली जाईल.” अशा शब्दांत त्यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली.

अलीकडेच अजित पवारांच्या एका वक्तव्यामुळे शेतकरी कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. पण आता अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं की, “मी कधीच कर्जमाफी नाकारली नाही. योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल. बच्चू कडू यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग नक्की काढता येईल.”

हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकार देणार दरमहा पेन्शन जाणून घ्या पात्रता, कागदपत्रं आणि अर्ज प्रक्रिया

शेतकरी आंदोलकांच्या मागण्यांमध्ये दूध दराचा प्रश्नही आघाडीवर आहे. दूध दरात योग्य सुधारणा व्हावी, कर्जमाफी तातडीने मिळावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशा मागण्यांसाठी आंदोलन पेटलं आहे. सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांशी मोकळ्या मनाने चर्चा करावी, अशी अपेक्षा सध्या महाराष्ट्रभर व्यक्त होत आहे.

शेवटी एवढंच म्हणावं लागेल की, शेतकरी हाच देशाचा कणा आहे, त्याच्या प्रश्नांकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये, तर तो एक माणूस म्हणून त्याच्या जीवनाशी निगडीत आहे, हे सरकारनेही समजून घ्यायला हवं. आज शेतकरी रस्त्यावर उतरतो आहे, त्याला न्याय मिळेल का, हा खरा प्रश्न आता प्रत्येक मराठी मनात निर्माण झाला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “Maharashtra Farmer Loan Waiver: बच्चू कडूंचं उपोषण सुरु, अजित पवार म्हणाले ‘कर्जमाफी मिळणार, पण…!’”

Leave a Comment