PM Kisan 20th installment date | शेतकरी म्हटलं की, संकटं त्याच्या पाठलागाला असतात. कधी पाऊस कमी, तर कधी बाजारात दर घसरले. अशा वेळी सरकारी योजनाच त्याच्या आधाराचा हात होतात. याच योजनांमध्ये केंद्र सरकारची “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना” ही एक महत्त्वाची योजना शेतकऱ्यांसाठी आहे.PM Kisan 20th installment date
या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६००० रुपये जमा केले जातात. हे पैसे तीन टप्प्यांमध्ये म्हणजेच दर चार महिन्यांनी २००० रुपये हप्ता अशा स्वरूपात दिले जातात. अनेक शेतकऱ्यांसाठी ही रक्कम छोटी असली, तरी वेळेवर मिळाली तर ती मोठा आधार बनते.
हे पण वाचा| शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 20 जूनला पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यात, तुम्ही तयार आहात का?
जूनमध्ये डबल फायदा? ४००० रुपये मिळणार!
सध्या शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न यावेळी २००० की थेट ४००० रुपये? तर हो! मध्य प्रदेशमधील काही भागांमध्ये शेतकऱ्यांना यावेळी थेट ४००० रुपये मिळणार आहेत. कारण या राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून २००० रुपये आणि राज्य सरकारच्या मुख्यमंत्री किसान कल्याण योजना अंतर्गत आणखी २००० रुपये दिले जातील.
म्हणजे एकाचवेळी डबल फायदा ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी का होईना पण smile येणार आहे.
२०वा हप्ता कधी जमा होणार?
सूत्रांनुसार, २० जून २०२५ रोजी केंद्र सरकारचा २०वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. याआधीचा हप्ता फेब्रुवारीत मिळाला होता. त्यामुळं आता जूनमध्ये दुसरा हप्ता देण्याची शक्यता प्रबळ आहे.
शेतकऱ्यांनी यासाठी काही महत्त्वाची कामं पूर्ण केलेली असावी लागतात, अन्यथा हप्ता अडण्याची शक्यता असते.
हे कामं करा, नाहीतर हप्ता मिळणार नाही!
- 1. ई-केवायसी (e-KYC) पूर्ण असणं आवश्यक
- 2. भूमी रेकॉर्ड अद्ययावत असावं
- 3. एकाच सदस्याने अर्ज केला पाहिजे डुप्लिकेट अप्लिकेशन नकोत
- 4. बँक खाते लिंक असावं आणि अॅक्टिव्ह असावं
यातील काही गोष्टी अपडेट नसतील, तर हप्ता तुमच्या खात्यात न जमा होण्याची शक्यता आहे.
कोण पात्र आहे या योजनेत?
- ज्यांच्याकडे २ हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन आहे
- शासकीय कर्मचारी नसलेले शेतकरी
- आयकर भरणारे शेतकरी पात्र नाहीत
- फक्त अर्ज केलेले आणि पात्र ठरलेले शेतकरीच
शेतकऱ्यांना भावनिक दिलासा
खरं सांगायचं तर, २००० रुपये म्हणजे फार मोठी रक्कम नाही. पण कधी कधी छोटा हातही मोठं आधार देतो. विशेषतः बियाणं, खतं, डिझेल यासाठीचा खर्च जुळवताना या रकमेचा उपयोग होतो.
हे पण वाचा| शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 20 जूनला पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यात, तुम्ही तयार आहात का?
राज्यात शेतकरी पावसाची वाट बघतोय, पेरणीचं बघतोय… आणि त्याचवेळी खात्यात आलेली रक्कम त्याला उत्साहाचं इंजेक्शन देऊन जाते.
Disclaimer:
वरील माहिती विविध शासकीय वेबसाईट्स, अधिकृत माध्यमं आणि बातम्यांवर आधारित असून ती केवळ माहितीच्या उद्देशाने दिली आहे. KrushiNews24x7.in कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा हप्त्याचे वितरण करत नाही. कृपया योजनेशी संबंधित अधिकृत माहिती व अपडेटसाठी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
1 thought on “ शेतकऱ्यांच्या खात्यात 2 दिवसात थेट ४००० रुपये जमा होणार! संपूर्ण माहिती वाचा””